मुरुडमधील मोकाट जनावरे आता गोशाळेत

पालिकेची आजपासून मोहीम
आगरदांडा | वार्ताहर |
मुरुडमधील उनाड गुरांना आळा घालण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून,ही जनावरे पकडून त्यांची रवानगी आता गोशाळेत केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी जाहीर केले आहे.
मुरुड शहरातील ठिक ठिकाणी रस्त्यावर उनाड गुरांचा कळपाचा वावर नित्याचाच झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.हा कळप अनेकदा रस्त्यांच्या मधोमध ठाण मांडून बसलेला दिसतात.यांचा परिणाम पादचारी, वाहनचालकांवर होत असून त्यांना होणार्‍या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने नगरपरिषद तर्फे अनेकदा मोकाट जनावरांच्या मालकांना बोलुन त्यांच्या बरोबर अनेकदा मिटींग घेण्यात आल्या तुमच्या गुरांनमुळे नागरिकांना खुप त्रास होत आहे.वाहतुक अडथळा होत आहे.त्यात गुरांनमुळे रस्त्यावर अस्वस्छता पसरत आहे.तरी यापुढे आप आपली गुरे रस्त्यावर न सोडता आपल्या घरीच बांधावी हे वारंवार सांगुन सुध्दा काही ही गुरे मालकांवर परिणाम होत नसल्याने नगरपरिषदेमार्फेत सदर गुरे पकडुन कोंडवाड्यामध्ये नेण्याची मोहीम सोमवारी 22 नोव्हेंबरपासून शहरात राबविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.पकडलेली गुरे सोडविण्यासाठी न आल्यास सदरची गुरे ही गोशाळेकडे सूपूर्द करण्यात येणार आहेत.तरी शहरातील तसेच शहराच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी आपली गुरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version