| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
भटके श्वान नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड डॉ. सचिन देशपांडे यांच्या दिलेल्या सूचनेनुसार पनवेल गटविकास अधिकारी समीर वाठारकर व सहाय्यक आयुक्त डॉ. समीर तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि.11) पनवेल पंचायत समिती येथे सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये भटके श्वान नियंत्रण कार्यक्रमात अंतर्गत सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाची, नगर विकास विभाग यांचे परिपत्रक, ग्रामविकास विभाग यांच्या परिपत्रक तसेच एडब्ल्यूबीआय मार्फत जारी झालेल्या एसओपी पत्रकाचे सविस्तर वाचन करून माहिती देण्यात आली. तसेच, ग्रामपंचायत पातळीवर भटके श्वान नियंत्रण कमिटी स्थापन करण्याच्या सविस्तर सूचना व मार्गदर्शनवरील सर्व परिपत्रकाचे वाचन करून डॉ. आनंद मारकवार पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती पनवेल यांनी सर्व उपस्थित ग्रामविकास अधिकारी यांना मार्गदर्शन केले. या सभेस मा. सहा. गट विकास अधिकारी आर बी कोलटक्के, संतोष ठोंबरे विस्तार अधिकारी पनवेल, महेश घबाडी विस्तारा अधिकारी पनवेल, सागर पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती पनवेल उपस्थित होते.
भटके श्वान नियंत्रण सभा
