खांदा वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल खांदा वसाहत परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, महिला व लहान मुलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे लागून त्यांना घाबरवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून, काहीजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत असून, पनवेल महानगरपालिकेने अद्याप ठोस कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांना खायला टाकणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी गल्लीबोळात फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरतात. दरम्यान, महानगरपालिका कधी ॲक्शन मोडवर येणार, असा सवाल पनवेलकर विचारत आहेत.

Exit mobile version