| चिरनेर | वार्ताहर |
चिरनेर गावासह चिरनेर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहेत. हे एकमेकांना चावून, जखमी होणार्या कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती दिसत आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांमध्ये, कळपाने फिरणार्या या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. श्री महागणपतीच्या मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही भटकी कुत्री मंदिर परिसरात विष्ठेची घाण करीत असल्यामुळे दर्शनासाठी येणार्या भक्तागणांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.