लहान मुलांना चावा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दहिवली आणि कोदीवले गावात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लहान मुलांना भटके कुत्रे चावा घेत असल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण या दोन्ही गावात निर्माण झाले आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांच्या डोक्यालादेखील या कुत्र्यांनी चावा घेतल्याने पालकवर्गात आपल्या मुलांना एकटे सोडण्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी तसेच कोदिवले गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लहान मुली तसेच वृद्ध नागरिकांना जखमी केले आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोदिवले तसेच दहिवली गावामध्ये कुत्र्यांनी थैमान घातला. या भटक्या कुत्र्यांपासून सुटका व्हावी यासाठी 16 जून 2025 तसेच 9 जून 2025 रोजी दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देण्यात आले होते. त्या अर्जाची दखल घेत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ कळवण्यात आले होते. परंतु, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या भटक्या कुत्र्यांचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त केला नाही. त्याचे परिणाम कोदिवले गावातील दोन मुलींना त्यामध्ये जखमी झालेली सिद्धी शेखर तरे हिच्या हाताला चावा घेतल्याने खूप मोठी जखम झाली आहे. तसेच दहिवली गावातील लहान मुलींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून, अनेकजण कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी केले आहेत. त्यामध्ये जखमी मानसी गोविंद भोईर या मुलीच्या डोक्याला चावा घेतला असून, डोक्यातून रक्तस्राव होत आहे. तसेच मालेगाव येथील खंडू भोईर यांनाही चावले आहेत.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर ही वेळ आलीच नसती, अशी टीका ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, अशा कामचुकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.







