ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
गृप ग्रामपंचायत माजगांव हद्दितील आंबिवली येथिल रस्त्यालगत पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र मागील महिन्यापासून हे पथदिवे बंद असल्यामुळे येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. विषेश म्हणजे या पथदिव्यांची चाचणी घेण्यासाठी हे दिवे मध्यांतरी लटकलेल्या अवस्थेत असल्यामुळे हे केव्हा उजेड देणार, असा प्रश्न ग्रामस्थांच्या पुढे निर्माण झाला आहे.
माजगांव हद्दित अनेक ठिकाणी हे पथदिवे आहे. मात्र आंबिवली येथिल असलेले पथदिवे बंद स्वरुपात असल्यामुळे हे केव्हा उजेड देणार, याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले आहे. या ठिकाणी सावरोली खारपाडा रस्त्यावर अंधार असल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हे दिवे लावण्यात आले होते. शिवाय हे सात ते आठ पथदिवे एकाच रांगेत असल्यामुळे 10 ते 12 फुटावर टांगते ठेवण्यांत आले आहेत. यामुळे भर पावसात रहदारी करणार्या ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर ग्रामस्थांची समस्या विचारात घेण्यासाठी ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करीत असल्याचा आरोप येथिल ग्रामस्थ करत आहेत.
हे पथदिवे मेढा योजने अंतर्गत बसविण्यात आले असून ज्या कंत्राटदारांना हे काम दिले आहे ते आमचा फोन उचनलत नाही. यामुळे हे काम थांबले आहे. मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत.
संदिप धारणे, ग्रामसेवक, माजगांव
आंबिवली येथिल बस थांब्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र अजूनही ते बंद स्वरुपात असून गेले अनेक दिवस याच स्थितीत आहेत. त्याचबरोबर हे पथदिवे मध्यांतरी लटकलेल्या स्थितीत ठेवण्यात आल्यामुळे अपघाताची समस्या निर्माण होऊ शकते.
गोपीनाथ जाधव, माजी सरपंच