ग्रामस्थांमध्ये समधान
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेले अनेक दिवस स्ट्रीट लाईट नसल्याकारणाने नागाव ग्रामस्थांना गैरसोय सहन करवी लागली. मात्र उच्च स्तरावरून काही निर्णय होत नव्हता. सद्यस्थितीत जिल्हा परिषदे मार्फत ग्रामपंचायतीने स्वनिधीतून शक्य असल्यास एप्रिल २०२१ नंतरचे स्ट्रीट लाईट बील भरण्याचे आदेश दिले लआहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायत नागांव कडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अलिबाग डिव्हीजन कार्यकारी अभियंता कुंदन भिसे साहेब यांजकडे स्ट्रीट लाईट मीटर बील रक्कमेचा चेक सुपूर्द करण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट सुरू केल्या आहेत. स्ट्रीट लाईट नसताना आपणा सर्वांची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच आजवर जसे सहकार्य लाभले तसेच सहकार्य पुढील काळातही लाभावे असे आवाहन सरपंच निखिल मयेकर यानी केले आहे.