वीज बिल थकल्याने पथदिवे बंद

नागरिकांत भीतीचे वातावरण
। नागोठणे । वार्ताहर ।
शासनाकडून भरण्यात येणारे पथदिव्यांचे वीज देयक न भरल्याने नागोठण्यासह विभागातील ग्रामपंचायतींचे पथदिवे वीज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आले आहेत. तर नागोठणे शहराच्या विविध भागातील पदपथावरील पथ दिवे वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाकडून दोन दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पदपथावरील हा वीजपुरवठा बंद झाल्याने शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यावरून काळोखात चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

सध्या पावसाळ्याच्या तोंडावर पथदिवे बंद झाल्याने रात्री रस्त्यावरून चालतांना नागरिकांच्या मनात धडकी भरत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षाच्या गणेशोत्सवापुर्वी वीज वितरणने थकित देयकामुळे अशाचप्रकारे पथदिवे बंद केल्याने नागोठणे ग्रामपंचायतीकडून सुमारे दोन लाख रुपये थकीत बिल भरल्यानंतर पथदिव्यांचा हा वीजपुरवठा सुरळीत झाला होता. आता शासनाकडून भरण्यात येणारे वीज देयक गेली 3 महिने थकित असल्याने नागोठण्यासह विभागातील ग्रामपंचायतींचे पथदिवे बंद करण्यात आल्याची माहिती विजवितरणचे नागोठण्यातील कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली.

Exit mobile version