कार्यकर्त्यांच्या आगमनाने ताकद वाढलीः आ. जयंत पाटील

शिरगाव, न्हावा, सोनखार, नवखार येथील कार्यकर्ते शेकापमध्ये
शिवसेनेच्या शिंदें गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दणका

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण गरिबांसाठी आहे. जो शोषित आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो. त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आपले काम आहे. त्या पध्दतीने सातत्याने काम करत आलो आहोत. कार्यकर्त्यांच्या आगमनाने एक वेगळी ताकद वाढली आहे. वेगळे बळ मिळाले आहे. चणेरा भागात सर्वाधिक मते आपल्याला मिळत असतात. आगामी काळात हा भाग पूर्ववत होईल असा विश्वास आहे, आ. जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

न्हावा, सोनखार, नवखार येथील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे आ. जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेतकरी भवनमध्ये हा सोहळा रविवारी (दि.08) पार पडला. यावेळी महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य नंदू म्हात्रे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष गोपीनाथ गंभे, विकास भायतांडेल, राज जोशी, अमोल शिंगरे, न्हावेच्या माजी सरपंच राजश्री शाबासकर, गोविंद भायतांडेल, शंकर शाबासकर, रवि शाबासकर, महादेव शाबासकर, सदानंद पाटील, नजीर रोगे, विजय पाटील, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील यांच्यासह नवनिर्वाचीत कार्यकर्ते उपस्थित होते.


आ. जयंत पाटील यांनी पुढे सांगितले, न्हावा ग्रामपंचायत गेल्या वेळेला आपल्याकडे आली. सरपंच आणि सर्व सदस्यांनी पाच वर्षात चांगले काम केले आहे. प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याबरोबरच काम पुर्ण करण्याची क्षमता सरपंचांनी ठेवली आहे. तीच परंपरा पुढे न्यायची आहे. कमीपणा आला तरी चालेल, माघार घ्यावी लागली तरी चालेल, पण इंडिया आघाडी कायम ठेवायची आहे. गावातील अंतर्गत वाद, पुढारपण विसरून देशाच्या व राज्याच्या हितासाठी इंडिया आघाडी भक्कम कशी राहिल यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. चांगले काम करत रहा. शेकाप तुमच्या पाठीशी कायम राहील,असेही ते म्हणाले.

मागील निवडणुकीत तटकरे आणि आपण एकत्र होतो. त्याचा गैरफायदा तटकरेने घेतला. पण न्हावे ग्रामस्थांनी जिद्दीने काम करून पंचायत खेचून आणली. आपण टेबलाखालून काहीच करत नाही. दिलेला शब्द पाळतो. एखाद्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तर तो मनापासून देतो. या निवडणुकांमध्ये यंत्रणा, पैशाचा वापर केला जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत आपण जिद्दीने व विकासाच्या मुद्यावर ग्रामपंचायती खेचून आणायच्या आहेत. खोटी आश्वासने न देता कामे करा असा सल्ला आ. जयंत पाटील यांनी दिला.

सोनखारमध्ये मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या पध्दतीने निधीचा वापर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. होड्यांसाठी नवीन योजना आली आहे, त्याचा फायदा मच्छीमारांना झाला पाहिजे. आलेल्या संधीचा उपयोग लोकांच्या उन्नतीसाठी कसा करता हेोईल. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. आज शेकापसाठी वातावरण चांगले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात आले. त्यांना कधीच नाराज करणार नाही, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शिरगांवमधील प्रवेश करणारे कार्यकर्ते
जितेंद्र सातमकर, पुनम सातमकर, संदीप सातमकर (माजी ग्रामपंचायत सदस्य, वळके), सुरज सातमकर, प्रेमल सातमकर, नितीन शेडगे, वैशाली शेडगे, तारा शेडगे, गुलाब सातमकर, वैशाली सातमकर, अपर्णा सातमकर, अश्वीनी सातमकर, कल्पना भोईर, ललिता पनवेलकर, पदी पनवेलकर, बबीताई सातमकर, वासंती पाटील, प्रदिप पाटील, नरेश पाटील, पुष्पा पाटील,  मनिषा सातमकर, शैला पाटील, वत्सला पाटील, निर्मला पाटील, राजश्री भगत, दिपेंद्र पाटील, संदेश पाटील, राजू पनवेलकर, रामचंद्र सातमकर, काना पाटील, दक्षता भोईर.
सोनखार व नवखार येथील राष्ट्रवादीतून शेकापमध्ये प्रवेश करणारे
निळकंठ कासकर, रामनाथ कासकर, नरेंद्र कासकर, दिगंबर कासकर, सागर कासकर, अविनाश कासकर, बारक्या कटोरे, कुणाल कासकर, नरेंद्र कासकर, दुर्वेश सर्लेकर, सुदर्शन डोलकर, अर्चना दिवकर, अवधूत कासकर, वत्सला कासकर, संजीवनी कासकर, नलीनी कासकर, विमल डोलकर, लक्ष्मण झुरे, गजानन बटारे, अंजली कासकर, शुभांगी कासकर, हिरावती किटोरे, कमलाय कासकर, कविता डोलकर, प्रणाली कासकर, पुजा कटोरे, नामदेव कटोरे.
राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून प्रवेश
रोहा तालुक्याती सोनखार येथील कार्यकर्ते गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये होते. परंतु तटकरेंकडून त्यांची घोर निराशा झाली. दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यास उदासीन ठरल्याने अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून शेकापच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून निळकंठ कासकर यांच्यासहित शेकडो जणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
शिरगांवमध्ये शिंदे गटाला दणका
मुरुड तालुक्यातील शिरगांवमध्ये शिंदे गटातील पुढाऱ्यांकडून फक्त आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे शिंदे गटातील कारभाराला कंटाळून वळके ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप सातमकरसह जितेंद्र सातमकर, पुनम सातमकर अशा असंख्य शिरगावमधील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात रविवारी प्रवेश केला. आ. जयंत पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पुरोगामी युवक तालुका अध्यक्ष शरद चवरकर, माजी उपसरपंच विजय म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेकापचे जिल्हा सहसचिव मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मागील 2019च्या निवडणुकीमध्ये खोटी आश्वासने देऊन विरोधकांनी मते मिळवली. गोरगरीबांची प्रचंड फसवणूक केली. नोकरी देण्याचे अमिष दाखविले. परंतु प्रत्यक्षात काम केले नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष मागील तीन पिढ्यांपासून गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी काम करीत आहे. प्रभाकर पाटील यांचा आदर्श ठेवत पाटील कुटुंबीय काम करीत आहोत. आमचे हे आमचे कर्तव्य आहे. शेकाप नेहमी तुमच्या पाठीशी राहिल.

चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख

शिरगांव गावातील साई मंदिराच्या संरक्षित भिंतीचे काम शेकापने पुर्णत्वास नेले. यापूर्वी मी शिवसेनेमध्ये काम केले होते. आता शेकापमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांना शेकापमध्ये मानसन्मान मिळतो. शिरगांवचा विकास शेतकरी कामगार पक्षाने केला. गोरगरीबांसाठी काम करणारा पक्ष आहे. जोमाने कामाला लागून ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे

गजानन पाटील, शिरगांव
Exit mobile version