मधमाशी पालनातून अर्थव्यवस्थेला बळ

| उरण | प्रतिनिधी |

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्यावतीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने मधमाशी पालन प्रकल्प व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जेएनपीए प्रशिक्षण केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जेएनपीएच्या महाव्यवस्थापक (प्रशासन) व सचिव मनीषा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसंरक्षक कॅ. बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, जेएनपीएचे अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतींचे सरपंच, नागरिक व बंदर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्रात मधमाशी पालन हा केवळ पूरक व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वाचा उद्योग असल्याचे अधोरेखित करण्यात आले. जेएनपीए परिसरात मधमाशी पालनासाठी उपयुक्त वनस्पती व फुलझाडांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. मँग्रोव्ह (खारफुटी) वनस्पतींचा समावेश करून पर्यावरण संवर्धनासोबत मध उत्पादन वाढीस मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मधमाशी पालनासाठी उपलब्ध शासकीय योजना, अनुदाने, प्रशिक्षण सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुरेंद्र जक्कर यांनी विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, अर्ज प्रक्रिया व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.

Exit mobile version