| रसायनी । वार्ताहर ।
रसायनीमध्ये विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ विदेशी दारुचे मद्यविक्रीचे दुकान 19:45 वाजेपर्यंत उघडे ठेवून कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर न पाळता दाटीवाटीने गर्दी करुन मिळून आले असल्यामुळे त्यांनी कोरोणा विषाणु रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती करुन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कार्यालयीन आदेशांचे उल्लंघन केले म्हणुन चांभार्ली हरिओम पार्कं येथील अमर वाईन्स दुकानात मद्यविक्री आवारात आरोपी सूरज शंकर बंगेरा (वय 24),प्रदिप त्रंबक खचरे (वय 43), प्रविण सुनिल पवार (वय 29),गुरुदया अप्पी हिरी (वय 20), गिरीश रमेश मुळचराणी (वय 33), सोमनाथ काकरे (वय 43),यांना सिआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली असून पुढील तपास तपासिक अंमलदार ठाकूर करत आहेत.