शेणाटे येथील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी

। तळा । प्राथनिधी।
तळा तालुक्यातील शेणाटे येथे मृत दिनेश बटावले याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
शेणाटे येथे दिनांक 24 मे रोजी दिनेश बटावले या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भास्कर कारे व अन्य एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.त्यामुळे या दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन तळा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना देण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष नाना भौड, समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सामाजिक सेलचे उत्तम जाधव, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले, कैलास पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version