। कोलाड । वर्ताहर ।
निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली असून या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरण पार पाडण्यासाठी कोलाड पोलिस ठाण्यात सपोनि नितीन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा गुरुवारी (दि.17) घेण्यात आली होती.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना सपोनि नितीन मोहिते यांनी सांगितले कि, येत्या विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे सर्व जनतेने काटेकोरपणे पालन करावे, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित जाहिरात फलक, बॅनर, लाऊडस्पीकर यासारखे शासकीय स्वरूपाचे फलक तसेच प्रचार रॅली काढण्याच्या दोन दिवस अगोदर सांगणे, मतदानाच्या दिवशी बूथवर व मतदार केंद्रात कोणताही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे. यावेळी सुरेश महाबळे, चंद्रकांत लोखंडे, संजय कुर्ले, महेंद्र वाचकवडे, रवींद्र तारू, कुमार लोखंडे, पपी चव्हाण, संजय लोटणकर, बाळा गायकवाड, संजय सानप, संजय तेलंगे, असिफ सय्यद यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, गोपनीय अंमलदार नरेश पाटील उपस्थितीत होते.