| पेण | प्रतिनिधी |
कासू विभागातील निगडे या ग्रामपंचायतीमध्ये शेकापच्या सरपंचपदाच्या उमेदवार दर्शना म्हात्रे यांनी पहिल्याच टप्प्यात प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे प्रचारासाठी आबालवृध्द रॅलीमध्ये सहभागी होत आहे.
शिवसेना (शिंदे गट) विरुध्द शेकाप समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणूकीला सामोरे जात आहेत. गेल्या, पाच वर्षात गावचा खुंटलेला विकास आणि सरपंचाचे गावाकडे असलेले दुर्लक्ष या बाबींमुळे सरपंचावर नाराज असणारे निगडे ग्रामस्थ एकत्र येऊन आघाडी निर्माण केली आहे. या मध्ये शेकाप, शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस यांचा समावेश आहे.