| सुधागड-पाली | वार्ताहर |
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम खोर्यातील एका रिसॉर्टमध्ये 22 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 27 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, तालुक्यातील पालीकरांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
सुधागड तालुक्यातील पालीकरांनी या अमान्विय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.