संक्रांतीच्या निमित्ताने मुरुडमधील उमेदवारांच्या जोरदार हालचाली

। आगरदांडा । वार्ताहर ।
राज्य निवडणुक आयोगाने नगरपरिषदेच आरक्षण जाहीर केल नसलं तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या वार्डात मंकर संक्रांतीच्या निमित्ताने इच्छुकांने पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू करून उमेदवारांनी गाठीभेटी सुरू केल्या. नगरपरिषदेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयामुळे यंदाची होणारी सार्वत्रिक मुरुड- जंजिरा नगरपरिषद निवडणूक करिता 10 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.त्या बरोबर नगरसेवकांची संख्येत वाढत होतं आहे. 17 वरून 20 होणार आसणार आहे. दरम्यान नगरसेवकांची संख्या वाढविल्याने राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आय कॉग्रेस पक्षाची युती आहे.हीच युती मुरुड-जंजिरा नगरपरिषदे करिता होईल की नाही हे सांगता येत नाही.रायगड जिल्हात नगरपंचायत करिता ही युती टिकावण्यास तीन ही पक्ष अपेक्षी ठरले होते.त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूकीत उभे राहण्याकरिता बाशिंग बांधून तयार आहेत.

राज्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल 19, जानेवारी 2022 असुन त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत राज्य निवडणुक आयोग नगरपरिषदेचा आरक्षण जाहीर करू शकतो असं राज्यकीय विशेषणल मत आहे. येणा-या कोणत्याही निवडणूका ओबीसी आरक्षण शिवाय घेऊ नये असं मत राज्यकर्ते व विरोधकांच एकमत असुन तरी निवडणूक आयोगाने येणार्‍या निवडणूका पुढे धकल्याव्या परंतु निवडणूक आयोग याला प्रतिसाद देतो की निवडणूकीचं कार्यक्रम जाहीर करतात हे आता लवकरच कळणार आहे.

Exit mobile version