| उरण | वार्ताहर |
मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे, हा निकाल लागताच बुधवार (दि.10) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण तालुका व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उरण शहर शाखेसमोर जिल्हाप्रमुख माजी आ. मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत व काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे, कमलाकर पाटील, जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, के एम घरत, जगजीवन भोईर, दिलीप रहाळकर, किसन म्हात्रे, अतुल ठाकूर, कैलास पाटील, गणेश पाटील, अनंत पाटील, रजनीकांत पाटील, नारायण तांडेल, गणेश शेलार, ममता पाटील, सुजाता गायकवाड, मनीषा ठाकूर, वीणा तलरेजा, वंदना पवार, कल्पना गराडे, अन्वर कुरेशी, एजाज मुकादम, मुमताज भाटकर, रुबीना कुट्टी, साईरा खान, संजना कोष्टी, कविता गाडे, हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, सरपंच सी. के.गायकवाड, महेश वर्तक, रवी पाटील, मेघशाम कडू, गणेश घरत, शैलेश भोईर, अजय म्हात्रे,मोहम्मद शेख, नंदू पाटील, सिद्धेश म्हात्रे, उमेश भंडारी, रवींद्र पाटील, करण पाटील, आदी उपस्थित होते.