। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
यजमान अमेरिकेने आयसीसी टी-20 विश्वचषकामध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. अँड्र्यू गॉस आणि अॅरॉन जोन्स या जोडीने तुफानी फलंदाजी करत कॅनडाच्या गोलंदाजांना सळोकी पळो करून सोडले. सह-यजमान अमेरिकेने आसीसी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा सात गडी राखून पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली.
प्रथम फलंदाजी करताना नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा करत विजयाची नोंद केली. अमेरिकेकडून अॅरॉन जोन्सने दमदार फलंदाजी करत 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. अॅरॉनने अँड्रिससोबत तिसर्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. अँड्रिसनेही 46 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.