पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांचे निर्देश
| पनवेल | वार्ताहर |
वादळी वार्यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग्स कोसळून अनेक निष्पापांचा जीव गेला. 13 पेक्षा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 50 पेक्षा जास्त जण या अपघातात जखमी झाले आहेत. या घटनेवरून राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्सचा विषय ऐरणीवर आला आहे. पनवेल महानगरपालिकेतील होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.
87 होर्डिंग्स मालकांना याबाबत पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सुचना या नोटिसांमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अनधिकृत होर्डिंग्सची माहिती घेण्याच्या सुचना चारही प्रभाग अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहेत. घाटकोपरमधील घटना पनवेलमध्ये देखील घडण्याची दाट शक्यता आहे. अनेक सोसायट्या आणि घराशेजारी हे अनधिकृत होर्डिंग्स उभारले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे.
87 होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी धोकादायक होर्डिंग्स त्वरित हटविल्या जाणार असुन पालिका क्षेत्रातील इतर अनधिकृत होर्डिंग्सची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
डॉ प्रशांत रसाळ
आयुक्त, पनवेल महानगरपालिका