। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण वैश्य समाज, चिपळूण या संस्थेतर्फे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविणार्या तसेच विविध शाखातील पदवीधर असणार्या चिपळूण वैश्य समाजाशी निगडित चिपळूण शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मान वैश्य समाज बांधवांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4.30 वाजता राधाताई लाड सभागृह वैश्य भवन, चिपळूण येथे आयोजित केलेला आहे.
इयत्ता 10 वी मध्ये किमान 80 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण व 12 वी मध्ये किमान 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील पदवीधर ज्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, विधी व न्याय पदवीधर इत्यादी क्षेत्रातील पदवीधरांचा गौरव केला जाणार आहे. त्यासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुण पत्रकाची झेरॉक्स 5 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 पर्यंत कै. राधाताई लाड सभागृह वैश्य भवन येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये सादर करावी. 5 जुलै नंतर आलेली गुणपत्रके स्वीकारली जाणार नाहीत. कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याने गुणपत्रिकेचा फोटो मोबाईल वर पाठवू नये. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव श्री. अमोल टाकळे मो.9423296920 आणि सभागृहाचे व्यवस्थापक श्री. प्रदीप खेडेकर मो. 7558433974 /9503603538 यांच्याकडे संपर्क साधावा. सदर कार्यक्रमासाठी सर्व ज्ञाती वैश्य समाज बांधवांनी नियोजित वेळेत सायंकाळी ठीक 4:30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन चिपळूण वैश्य समाज चिपळूणचे अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर व सचिव श्री. अमोल टाकळे यांनी संस्थेमार्फत केलेले आहे.