| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सीवूड्स येथील पोद्दार शाळेत शुक्रवारी (दि.7) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु असल्याची माहिती डीसीपी डहाणे यांनी दिली. दरम्यान, एका विद्यार्थ्याने अशा प्रकारे जीवन संपण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली. तसेच पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.