। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे एका युवतीने आत्महत्या केली. लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या या मुलीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. युवतीने आपल्या घरातच किटकनाशक प्राशनकरून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. मुलीने किटकनाशक घेतल्याचे लक्षात येताच, कुटुंबीयांनी तिला तातडीने लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.






