जेएसएममध्ये विद्यार्थी सुविधा केंद्र

अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जे. एस. एम. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा व सहाय्यता केंद्रं सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सोमवारी सकाळी महाविद्यालयातील जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अनिल पाटील, प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. अ. व्ही. जाधव, प्रवेश समिती सदस्य प्रा. अ. आर. मेहेंदळे, प्रा. टी. डी. वाल्डे, प्रा. के. बी. चौगुले, ग्रंथपाल सुबोध डहाके, महाविद्यालयाचे प्रबंधक, जी के गिते, आर. के. शेलार, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे, परीक्षा, स्कॉलरशिप यांचे फॉर्म भरणे व इतर सर्व सहकार्य केले जाणार आहे. झेरॉक्स, प्रिंट करणे व इतर ऑनलाईन सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना या सुविधा केंद्राचा नक्कीच चांगला उपयोग होईल

– अ‍ॅड. गौतम पाटील,अध्यक्ष

जनता शिक्षण मंडळ मानद चिटणीस मिलिंद पाटील, कुंदन सावंत, सत्यजीत तुळपुळे इत्यांदिनी सदर केंद्र उभारणीसाठी विशेष मेहनत घेतली.सोमवारपासून महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2022-23 चे प्रवेशाचे कामही सुरु झाले. सदर सुविधा केंद्रामुळे विद्यार्थ्यांना एका छताखाली व अत्यंत अल्प दरात सर्व सुविधा व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. या केंद्रांतून भविष्यात सल्ला केंद्र व विद्यार्थी सहकारी भांडार साजर सुरू करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी या वेळी दिली.

Exit mobile version