| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.17) करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल किती वापरावा, आई-वडिलांबरोबर तसेच शिक्षकांबरोबर, मित्रांमध्ये संवाद कसा असावा, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच व्यक्तिमत्व विकास कसे घडवावे, रोजगाराच्या संधी कशा मिळव्यात, व्यवसाय कसा निवडावा, या सर्व विविध घटकांविषयी उद्बोधक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. पी आर कारुळकर, डॉ. अरुण चव्हाण, डॉ. एम जी लोणे, डॉ. अनुपमा कांबळे, प्रा.थावरे, प्रा. रियाज पठाण, प्रा. हन्नत शेख, प्रा. विनिता तांडेल तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







