विद्यार्थ्यांनी तयार केले सीड बॉल

| हमरापूर | वार्ताहर |

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, या पर्यावरणविषयक चळवळीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असावा यासाठी पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मायणी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने सीड बॉल तयार केले आहेत.

मे महिन्यातील सुट्टीचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी विविध फळांच्या बिया गोळा करून समप्रमाणात माती व शेणखत यांच्या मिश्रणाने हे गोळे तयार करून त्यामध्ये प्रत्येकी एक किंवा दोन या प्रमाणात फळांच्या बिया ठेवल्या आहेत. उन्हामध्ये हे गोळे वाळवले असून, पावसाळा सुरू झाला की हे सीडबॉल गावाच्या अवतीभवती असलेल्या पडीक जमिनीवर ठेवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी हे सीडबॉल तयार करण्यासाठी मायणी शाळेतील शिक्षक रामकृष्ण भोईर यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असताना मायणी शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version