पीएनपीचे विद्यार्थी झाले लसवंत

विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पडले
चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी संकुलात ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून गुरुवारी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्राला पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी भेट दिली. लसीकरण केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती उपसभापती मीनल माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य संजय मिर्जी, अजित माळी, लसीकरण केंद्राचे डॉक्टर अंतेश्‍वर वडमिलवार, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड एच.एस. फर्डे, आरोग्य सहाय्यक विंदा म्हात्रे, आरोग्य सहाय्यक गणेश राठोड, विट्ठल बडे, समुदाय आरोग्य अधिकारी सानिका गावडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाच्या उत्परिवर्तित कोरोना आणि ओमिक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार सुरू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शाळा, कॉलेजेसमधील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे. पीएनपीच्या ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थांचे लसीकरणसुद्धा सुरू करण्यात आले आहे.

Exit mobile version