क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

| नागोठणे | वार्ताहर |

कै. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाच्या कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठणे येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. शाळा समिती चेअरमन नरेंद्र जैन व शाळा समिती सदस्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नरेंद्र जैन यांच्यासह सदस्य अनिल काळे, राजेंद्र जैन, सोनल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रा. एम.के. पाटील, सकाळ सत्र प्रमुख श्री. गायकवाड, दुपार सत्र प्रमुख श्री. जेडगे, स्टाफ सेक्रेटरी श्री. गाडे, शिक्षक प्रतिनिधी श्री. गावित, वरिष्ठ लेखनिक श्री. गोळे, क्रीडा शिक्षक वाय.वाय. म्हात्रे व रमेश पारधी त्याच प्रमाणे सर्व शिक्षक वृंद आणि यशस्वी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, 800 मी. धावणेमध्ये मंथन खोपरे आणि यश म्हात्रे यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सानिया भोईर हिने बॉक्सिंग व रोहित गायकवाड, सम्यक गायकवाड, प्रशांत सारगे, समृद्धी राऊत यांनी वुसु या खेळात यश मिळवले. या सर्वांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version