गुणवंत विद्यार्थी, क्रीडापटू, आरोग्य सेविकांचा सन्मान

। पाली । वार्ताहर ।
कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ, रायगड, ठाणे, पालघर, देऊर विभागाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने गुणवंत विद्यार्थी, उद्योजक, क्रीडापटू, डॉक्टर, पोलीस, होमगार्ड, आरोग्य सेविका आदी मान्यवर व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार समारंभ पांडुरंग साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरंग कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल मोरे, एम.डी. चाळके, कार्याध्यक्ष उमेश कदम, बाबू मोरे, सहसचिव सुनील देवरे, खजिनदार सुभाष सावंत, सुरेश सकपाळ, उषा साळुंखे, रामचंद्र देवरे, सीताराम जाधव, नारायण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चौथी ते पदवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बॉडी बिल्डर उदय राजाराम देवर, हॉकीपटू पार्थ निलेश कदम, व्यावसायिक रुपेश कदम, मारुती कदम, उदय देवरे, शरद देवरे, डॉ. अमृत कदम, शिवानी कदम, होमगार्ड महेश देवरे, जयदीप देवरे, पोलीस विजय देवरे, आरोग्य सेविका अंजली साळुंखे, श्‍वेता साळुंखे, मयुरा साळुंखे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आर.बी. कदम यांच्या स्मरणार्थ भजन मेळावा, कोयनारत्न कै. कृष्णाजी मुसळे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आणि सीताराम शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

Exit mobile version