विद्यार्थी बनले मूर्तीकार

| कोर्लई | वार्ताहर | कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पनवेल येथील शालेय विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे शाडूची माती, लाल माती व उपलब्ध पिठापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचे काम मोठ्या उत्साहाने केले. सध्या पर्यावरणाला हानिकारक अशा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूजनासाठी आणल्या जातात. त्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर खूप कालावधीपर्यंत पाण्यात जशाच्या तशाच राहतात, त्यामुळे लोकांच्या भावनाही दुखावल्या जाण्याची शक्यता असते. या उपक्रमांतर्गत लहान मुले आपल्या घरातच मातीच्या मूर्ती बनवतात. मूर्ती बनवण्याचा आनंद वेगळाच असल्याच्या भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या. प्रत्येकाने मातीच्याच मूर्तीचा आग्रह धरावा, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हा उद्देश समोर ठेवून या उपक्रमाला सुरुवात केली आहे, असे मत शाळेचे कला शिक्षक पी.आर. नेरुरकर यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकूर, वरिष्ठ शिक्षक अनंत पाटील, सुविद्या वावेकर व सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून सहकार्य मिळाल्याच्या भावना नेरुरकर यांनी व्यक्त केल्या. शाळा समितीचे सभापती तथा आमदार बाळाराम पाटील, शाळा समितीचे सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकूर यांनी मूर्तिकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुलांचा घरुनच सहभागदरवर्षी हा उपक्रम शाळेत राबविला जातो. यात शाळेतील जवळपास 150 ते 200 विद्यार्थी सहभागी होऊन सुंदर-सुंदर मूर्ती बनवतात. परंतु, सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांनी घरूनच या उपक्रमात सहभाग दर्शविला.

Exit mobile version