| कोलई । वार्ताहर ।
जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 22 डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल पनवेल या ठिकाणी घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, कर्जत, नागोठणे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, खोपोली, सुधागड, महाड, उरण, खालापूर, तळा इत्यादी तालुक्यातून विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुरुड व अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलेले आहेत.
वयोगट मुले व मुली 14, 17, 19 :- अनुज भोईर प्रथम क्रमांक (नज हायस्कूल), ग्रीष्म राऊळ प्रथम क्रमांक (नज हायस्कूल), सानिया फुलारे प्रथम क्रमांक (कोएसो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा), आदित्य कांबळे प्रथम क्रमांक (सुविध्या स्कूल), नहुष पवार द्वितीय क्रमांक (नचिकेतास हायस्कूल विहूर), नेहाल घोले द्वितीय क्रमांक (कोएससो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा), पर्वणी चोर्घे द्वितीय क्रमांक (कोएसो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा), पायल सुतार द्वितीय क्रमांक (कोएसो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा), आयुब उल्डे द्वितीय क्रमांक (नज हायस्कूल), पायल राठोड तृतीय (कोएसो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा), सूरज कोहली तृतीय (कोएसो वि.म.पिळणकर कनिष्ठ महाविद्यालय, रेवदंडा ), श्रृष्टी कांबळे तृतीय ( कोएसो स. रा. ते. विद्यालय, रेवदंडा), सानिया पिळणकर तृतीय (कोएसो स.रा.ते.विद्यालय, रेवदंडा), तांजिला मुक्रिरे तृतीय (रेवदंडा), परशुराम झावरे तृतीय (रेवदंडा), भावार्थ पाटील तृतीय (रेवदंडा), तनिष पाटील तृतीय (अलिबाग), परी नाकवा तृतीय (चिंतामणी केळकर विद्यालय अलिबाग) या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक सिहान-नंदकुमार वरसोलकर, सनी खेडेकर, अरविंद भोपी, ओंकार वरसोलकर, शिवम सिंह व क्रीडा शिक्षक इत्यादींचे मार्गदर्शन केले आहे.