| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा परिसरात सिंचनाचा आधार असलेले शेतकर्यांनी दुबार भातापिकांच्या लागवडीसाठी मशागतीचे तसेच रोप तयार करण्यासाठी पेरणी सुरू केली आहे. माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या जांभिवली गावाला बामणोली धरणाचा तसेच एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणार्या पाण्याचा दुबार शेतीला आधार होतो. याच पाण्यावर शेतकरी दरवर्षी भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. दुबार लावणीसाठी नांगरणी, जमीन बंदिस्त, शेतातील गवत काढणे, पालापाचोळा गोळा करणे बियाणे पेरणी आदी कामे शेतकर्यांकडून सुरू आहेत. सध्या रोपाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्याने काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. तर लावणीसाठी रोपे साधारण पंचवीस दिवसांत तयार होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.