साळाव शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रतापगड, महाबळेश्वरला भेट
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील रा.जि.प. शाळा साळाव मराठी शाळेची शैक्षणिक सहल मुख्याध्यापक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 15 डिसेंबर रोजी प्रतापगड-महाबळेश्वर येथे काढण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी देऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला.
या सहलीमध्ये प्रतापगड या ऐतिहासिक किल्ल्याला तसेच निसर्गरस्म्य महाबळेश्वरला भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक काटकर आणि शिक्षिका रेश्मा धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळांची माहिती दिली. या सहलीत 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. ऐतिहासिक किल्ला पाहताना मुलांच्या अंगात स्फुरण चढले होते. ङ्गशिवाजी महाराज की जयफ अशा घोषणा देत विद्यार्थी खाली उतरले. या सहलीमुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद
