विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

| म्हसळा | वार्ताहर |
सहल म्हटली विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आनंदाचा दिवस. आणि सहल ही वर्षभरातील शालेय नियोजनातील एक महत्त्वाचा भाग. प्राथमिक (इ.1 ली ते 4थी) विभागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय परिसरात, पूर्व प्राथमिक (इ.5 वी ते 7 वी ) विभागातील विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या बाहेर आणि जिल्ह्यात आणि वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याबाहेर असा साधारण सहलींसाठीचा क्रम असल्याचे समजते.

म्हसळा मराठी मुला-मुलींच्या शाळेची परिसर सहल दि. 3 डिसेंबर रोजी तालुक्यातील श्रीक्षेत्र अमृतेश्‍वर स्वयंभू शिवमंदिर देवघर येथे नेण्यात आली. मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या नियोजनाखाली काढलेल्या या सहलीत सौमित्रा खेडेकर, कल्पना पाटील, रुचिता मेथा, इंदिरा चौधरी, वंदना खोत, सत्तरसिंग पावरा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबू शिर्के, विधी साळुंखे, अजय करंबे, संतोष सुर्वे, दीपल शिर्के, मयूर बनकर, वैशाली करंबे, समिधा वेदक, सोनाली लहारे, शिवनंदा शेळके आणि 180 विद्यार्थी सहभागी झाले होते. यानिमित्त विद्यार्थ्यांना शेती, बागायती, नद्या, ओढे, वीटभट्ट्या आणि अध्यापनास उपयुक्त अशा विषयांबद्दल माहिती देण्यात आली.

Exit mobile version