। खारेपाट । वार्ताहर ।
को.ए.सो. माध्यमिक विद्यामंदिर माणकुलेच्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, कला, क्रिडा, विज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बोर्ड परीक्षेत सतत तीन वर्ष 100 टक्के निकाल लावल्याबद्दल शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत रांगोळी प्रदर्शन, हस्तकला, चित्रकला व विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. को.ए.सो. संचालक माजी आमदार पंडित पाटील, शाळासमिती सभापती आस्वाद पाटील, शाळा समिती सदस्य डॉ. मनोज पाटील, प्रदिप म्हात्रे, शुभांगी पाटील व सरपंच जागृती म्हात्रे, प्रल्हाद पाटील, सदस्य तसेच बहिरीचापाडा, माणकुले, नारंगीचाटेप, बंगला बंदर परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक व महिला उपस्थित होत्या. कार्यकमाच्या प्रारंभी जय भवानी जय शिवाजी लेझिम पथक बहिरिचापाडा, कैलास म्हात्रे, राहिदास म्हात्रे व त्यांच्य सर्व सहकार्यांनी विविध कला कौशल्य दाखविले.