गोवे येथील विद्यार्थ्यांचा सत्कार

| कोलाड | वार्ताहर |

गोवे येथील माजी उपसरपंच नितीन जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 ते 4 थी पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे तसेच विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून बुधवारी (दि.19) राजिप प्राथमिक शाळा गोवे येथे नितीन जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर, इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नितीन जाधव, नामदेव जाधव, राजेश शिर्के, रामचंद्र कापसे, पांडुरंग जाधव, महेंद्र जाधव, निलेश जाधव, सतिश पवार, विशाल जाधव, वैभव जाधव, रजत जाधव, लिलाधर दहिंबेकर, राजेंद्र जाधव, शरद वारकर, अमित घरट, भिमराज कापसे, नयन जाधव, अजित दहिंबेकर, खेतन पवार, ओमसाईराम गृप, तरुण वर्ग, जयेश महाडिक, गांधारे व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version