| माणगाव | प्रतिनिधी |
छत्रपती शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील शाळा उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवड केली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शालेय परीसरात भाजीपाला, औषधी वनस्पती लागवड करण्यात आली.
सदर लागवडी अंतर्गत यापूर्वी कांदा, वांगी, शिराळी, कोथिंबीर, तोंडली, वांगी, मिरची इत्यादी पीक घेतले आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोषण आहारात सदर भाजीपाला दिला जात असे. गेल्या वर्षी शालेय परिसरात गवती चहा पातीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी गवती चहाची रोपे जोमदार वाढली असून, मोठ्या प्रमाणात गवती चहाच्या पाती तयार झाल्या आहेत. या गवती चहाला बाजारात चांगली मागणी सुद्धा आहे. त्यामुळे या गवती पातीच्या लहान लहान जुड्या करून विद्यार्थ्यांनी त्याची विक्री केली व त्यातून आर्थिक लाभ मिळविला आहे, तसेच ग्राहकांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांचा हिशोब लिहिला व मिळालेले पैसे पुढील लागवडीसाठी कार्यालयात जमा केले.
सदर भाजीपाला लागवड यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली त्यांना विद्यार्थ्यांनी साहाय्य केले. शाळेत लागवड केलेली भाजी विक्री झाल्याने विध्यार्थी आनंदित झाले असून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे .
संतोष कदम
मुख्याध्यापक
शाळा उपक्रमांतर्गत आम्ही भाजीपाला विक्री केला आहे. यातून आम्हाला आनंद मिळाला आहे.
ओंकार हिलम
विद्यार्थी
