। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब गावातील 1998 दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पाबळ येथेे मोठ्या उत्साहात पार पडला. 24 वर्षांनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्रमैत्रिणी एकत्र येऊन हा स्नेहमेळावा साजरा करत जनता हायस्कूलच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अलीकडे व्हॉटसअपमुळे गमावलेली, दुरावलेली नाती एकत्र येत आहेत. याच सोशल मिडियाच्या माध्यमातून पेणमधील गडब गावातील 1998 बॅचचे दहावीचे विद्यार्थी तब्बल 24 वर्षांनंतर एकत्र आले. गडब जवळ असणार्या पाबळ येथील निसर्ग रम्य ठिकाणी हा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या दहावी बॅचच्या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी नियोजनासाठी भगवान पाटील, जितू पाटील, प्रमिला पाटील, आशा पाटील, नागेश पाटील, प्रीतम केणी यांनी प्रयत्न केले होते.