विद्यार्थ्यांना दिले उटणे बनविण्याचे धडे

। कर्जत । प्रतिनिधी ।

महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानच्या वतीने ज्योवीस आयुर्वेदिक हॉस्पिटल दादर-मुंबई आणि उषा कृष्णा फाउंडेशन, नेरळ यांच्या सहकार्याने आयुर्वेदिक उटणे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.

महिला मंडळाच्या सभागृहात उटणे तयार करण्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या मनीषा सुर्वे, ज्योवीस आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉ. ज्योती सातपुते, वंदना भोसले, महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा मीना प्रभावळकर, मुख्याध्यपिका स्नेहा गाढे, श्रद्धा मुंढेकर आदी उपस्थित होत्या. मुख्यध्यापिका गाढे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविकात उपक्रमाचा उद्देश सांगितला.

डॉ. ज्योती यांनी आयुर्वेदिक उटणे कसे तयार करायचे, याचे प्रात्यक्षिक सादर करून प्रत्येक विद्यार्थ्याला ते तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर तयार झालेले उटणे विद्यार्थी व शिक्षकांना मोफत वाटप केले. याप्रसंगी प्रेमा पितळे, मेघा पिंगळे, स्मिता गणवे, आरती कोकरे, माधुरी देशमुख, सुप्रिया भासे, शारदा राठोड, सुषमा सुपे, वृषाली आदी शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version