| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर खास आयुर्वेदिक सुगंधित उटणे तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. संघाच्या हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिक उत्साहाने उटणे बनवण्याचे काम सुरु केले आहे. हळद, चंदन, केशर, गुलाबपाणी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करून हे उटणे बनवले जाते. ‘अजून आम्ही तरुण आहोत’ या उत्साही भावनेने सर्व जण कार्यरत असून, या उपक्रमातून संघाला आर्थिक मदतही मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिक या उटण्याला मोठी पसंती देत आहेत.






