विद्यार्थ्यांना मिळाला प्रवासी पास

माणगाव एसटी आगाराकडून हालचाली सुरू

। माणगाव । वार्ताहर ।

विद्यार्थ्यांनी आता एसटी पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. शाळांनी पुरवलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीनुसार माणगाव बस आगाराचे कर्मचारी एसटीचे पास थेट शाळेत येऊन देणार आहेत. यासाठी शाळा प्रमुखांनी पास साठी विद्यार्थ्यांची यादी माणगाव आगाराकडे द्यावी, अशी माहिती माणगाव बस आगाराचे व्यवस्थापक कोळी यांनी दिली.

माणगाव तालुक्यातील विविध शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाससाठी रांगेत ताटकळत बसण्याची गरज नाही. माणगाव बस आगारांने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडसर निर्माण होऊ नये तसेच, विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचणार असून परिवहन महामंडळाने एसटी पास थेट तुमच्या शाळेत हा अभिनव उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

माणगाव आगारांतर्गत येणार्‍या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना बस आगाराचे कर्मचार्‍यामार्फत शाळेत जाऊन पास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी बस आगाराच्या कर्मचार्‍यांनी माणगाव शहरातील, तसेच सर्व भागातील शाळांना भेटी दिल्या आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देणार असून यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी देणे आवश्यक आहे.

यंदाचे वर्षी माणगाव आगाराने विद्यार्थांना पास देण्याचे उदिष्ट ठरवले असून जून महिन्यात 1255 विद्यार्थी पास तर, 42 अहिल्याबाई होळकर, जुलै महिन्यात 2762 विद्यार्थी पास तर, 1834 अहिल्याबाई होळकर पास, ऑगस्ट महिन्यात 2593 विद्यार्थी पास, सप्टेंबर महिन्यात 3529 विद्यार्थी पास, 1168 अहिल्याबाई होळकर पास, ऑक्टोबर महिन्यात 1159 विद्यार्थी पास तर, 9 अहिल्याबाई होळकर पास, नोव्हेंबर महिन्यात 2902 विद्यार्थी पास तर, 815 अहिल्याबाई होळकर पास वितरीत करण्यात येणार आहे.

आतपर्यंत बस आगार कर्मचार्‍यांनी गोरेगाव ना. म जोशी विद्यालय, गोरेगाव उर्दू हायस्कूल, पन्हळघर जे.बी. सावंत हायस्कूल, तळा गो. म वेदक विद्यालय, उसर अभिनव ज्ञानमंदिर, बोरवाडी सुशीला का. भाटे माध्य विद्यालय, माणगाव कामेरकर हायस्कूल या सात माध्यमिक विद्यालयांना भेटी दिल्या आहेत. आतापर्यत 326 विद्यार्थांना पास असून 24 अहिल्याबाई होळकर पास देण्यात आले आहे. तसेच कांही विद्यार्थांचे अ‍ॅडमिशन पूर्ण झाल्यावर पूर्ण यावी घेवून पासेस वाटप करण्यात येणार आहे.

छाया कोळी, आगार व्यवस्थापक माणगाव
Exit mobile version