। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड आगारातून नांदगाव, मजगाव, आदाड, उसरोली, वेळास्ते मार्गावर जादा एसटी सोडण्याची मागणी उसरोलीचे सरपंच मनिष नांदगावकर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच मुरुड आगाराचे व्यवस्थापक सुनील वाकचौरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी केतन मांदाडकर उपस्थित होते.
शिक्षणासाठी रोज सकाळी 15 गावांमधून शालेय विद्यार्थी मुरुडमध्ये येतात. त्यांच्यासाठी एकच एसटी बस उपलब्ध आहे. अलिबाग-मुरुड एसटीमध्ये सर्व शालेय विद्यार्थी बसू शकत नाहीत. बस न मिळाल्यामुळे ते उशिरा शाळेत पोहोचतात. परिणामी, त्यांना शाळेत वेळेत पोहचण्यासाठी उसरोली येथून एक गाडी सुरु करण्याची मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
यावेळी वाकचौरे यांनी याबाबतचा प्रस्ताव विभाग नियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. तसेच मंजुरी मिळताच जादा गाडी सुरु करणार असल्याचे सांगितले.