| माणगाव | प्रतिनिधी |
स्वीप कार्यक्रमांतर्गत माणगाव येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, त्याकरिता दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या अंतर्गत शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग पुरस्कृत स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली असून, या कार्यक्रमांतर्गत माणगाव येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली.
या स्वीप कार्यक्रमांतर्गत आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः माणगावातून रॅली काढून मतदान जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या शाळेमध्ये शाळास्तरावर मतदान जनजागृतीपर चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा तसेच प्रबोधनपर निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे स्वीप कार्यक्रमात आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.