| आगरदांडा | प्रतिनिधी |
दिवाळी सणाचे औचित्य साधून मुरुड सार्वजनिक वाचनालयात दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सदस्य नैनिता कर्णिक यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आले.
यावेळी प्रवीण बैकर, संजय गुंजाळ, ग्रंथपाल उत्कर्ष गुंजाळ, सानिका भायदे आदी कर्मचारी, वाचक उपस्थित होते. दिवाळी पहाटची सुरुवात गायक सुरेश सद्रे यांच्या गीताने सुरुवात करण्यात आली. तद्नंतर राहुल वर्तक, पूजा सद्रे, मनीष माळी, अमोल रणदिवे, राज पुलेकर, सिद्धेश करंबे, राघव करंबे यांनी अतिशय सुंदर गीते सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली. कार्यक्रमाला खरी रंगत सुंदर निवेदन करून प्रेरणा चौलकर यांनी आणली, तर हार्मोनियम साथ मंदार मुंबईकर, तबला व ढोलकी महेश सुर्वे यांनी साथ दिली.