| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील राजिप सिद्धेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांना पत्रावळ तयार करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच देण्यात आले. दिवसेंदिवस वाढत चाललेला प्लास्टिकचा अतिवापर टाळावा व पर्यावरण संवर्धन व्हावे आणि ही पारंपारिक परंपरा जोपासावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपक्रमशील शिक्षक जनार्दन भिलारे यांनी प्रात्यक्षिक करून पत्रावळी कशी तयार केली जाते हे विद्यार्थ्यांना दाखविले व प्रत्यक्ष कृती करून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पळसाची पाने वेगळी करून मधल्या पानाच्या मागे दुसरे पान उलटे लावून घेतले, त्यानंतर दुसरी चार पाने चारी बाजूला बांबू काडीने टाचून घेतली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक सुंदर पत्रावळ तयार केली.






