| अलिबाग | वार्ताहर |
काही दिवसांपूर्वी जम्मु-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा नाहक बळी गेला होता. त्याचे पडसाद आता संपुर्ण देशात उमटत आहेत. देशात ठिकठिकाणी त्या विरोधात आंदोलने, निदर्शने व मृत पावलेल्यांना श्रंद्धाजली वाहण्यात येत आहे. अशातच अलिबाग तालुक्यातील धामणपाडा-शहाबाज येथील सचिन धुमाळ म्युझिक अॅकॅडमीतील पखवाज आणि बासरी वादक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना आणि आपले सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर मंगेश भगत, देवेंद्र पाटील, प्रमोद दांडेकर आणि आरती यांनी या प्रसंगी आपल्या भावना शब्दांमधुनही व्यक्त केल्या आहेत.







