एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल

| नेरळ | प्रतिनिधी |

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून, बुधवारी (दि.25) दहावीचा संस्कृत पेपर होता. पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेला एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. कळंब येथून नेरळकडे येत असलेल्या एसटी गाडीला पोशीर जवळ हा बिघाड झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पायपीट करून परीक्षा केंद्र गाठावे लागले.

सकाळची वेळ शक्यतो आपल्या निश्चित ठिकाणी नोकरीचे ठिकाणी जाण्याची प्रत्येकाची धावपळ असते. त्यात सध्या दहावीच्या परीक्षेचा पेपर देखील आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. त्यानंतर एसटीचे चालक आणि वाहकांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी तास झाला तरी सुरू होत नव्हती, शेवटी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले.

या गाडी मधून नेरळकडे जाणारे शहजाद लोगडे या तरुणाने रस्त्यावर उतरून पोशिर नेरळकडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून एसटीमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवून देऊ लागले. परीक्षेची वेळ जवळ येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तेथून पायी वारी देखील सुरू केली. मात्र, दीड दोन किलोमीटर अंतराचा प्रवास आणि त्यानंतर परीक्षा द्यायची असल्याने रस्त्याने जाणारे वाहनचालक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. अनेक दुचाकी चालक तसेच कार चालक हे विद्यार्थ्यांना घेऊन पोशिर विद्यालयाच्या जवळ सोडतानाचे आशादायक चित्र एसटी गाडी बंद पडल्यानंतर दिसून येत होते.

अचानक बंद पडलेल्या एसटीमध्ये 25 च्या आसपास विद्यार्थी होते. ते सर्व परीक्षा देण्यासाठी निघाले होते. ओलमनपासून बोरगाव आणि वारे भागातील हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी निघाले होते. साधारण दहाहून अधिक गावातील विद्यार्थी एसटी गाडी बंद पडल्याने तेथे थांबून होते.

-शहजाद लोगडे
स्थानिक रहिवाशी

Exit mobile version