विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा निश्‍चित करा

नेरळ । वार्ताहर ।
अनेकदा पालकांना प्रश्‍न पडतो की आपल्या मुलाने 10 वी व 12 वी नंतर पुढे काय करावे किंवा विद्यार्थ्यांनाही याबाबत स्पष्टता नसते. करिअरची दिशा निश्‍चित करण्यात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक असल्याचे दिसून येते, म्हणूनच उल्हास नदी बचाव या ग्रुपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी थोरात यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने प्रथम स्व ची ओळख करून घेणे आवश्यक असून त्या नंतर आपले ध्येय निश्‍चित केल्यास कोणतीही गोष्ट अवघड नाही. ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे किंवा जायचे आहे त्याबाबत शासनाने सुरू केलेल्या महा करियर पोर्टलवर जाऊन विद्यार्थ्यांनी एकदा माहिती घेतल्यास अनेक गोष्टींची उकल होईल.

स्वतःचा वेळा पत्रक तयार करून त्या प्रमाणे नियोजन केल्यास सायन्स, कॉमर्स, कला शाखेतील अंतिम ध्येय सहज गाठता येईल. विद्यार्थ्यांनी फक्त पदवी न घेता त्यास अनुसरून अनेक छोटे छोटे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत ते जर केले तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. तसेच, शालेय जीवनात करिअर हेच मुख्य ध्येय असून समाज माध्यमावर मुलांनी स्वतःचा वेळ वाया घालवू नये अन्यथा जे ठरवले आहे ते ध्येय गाठणे नक्कीच अवघड आहे.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन प्रा. दीपक थोरात यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पंकज तरे यांनी केले. याप्रसंगी भास्कर तरे, ड पंकज तरे, राजेंद्र सोनावळे, सुभाष सोनावळे, महेश तरे, गणेश तरे, अरविंद तरे, देवेंद्र तरे , नरेश कालेकर, हर्षद तरे, रोहन तरे, भानुदास तरे, विशाल सोनावळे, संदीप तरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version