विद्यार्थ्यांनी उत्तम माणूस बनावे – भगत

| पोलादपूर | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांनी नुसते पैसे कमविण्यासाठी न घेता खर्‍या अर्थाने ज्ञान मिळविण्यासाठी घ्यावे आणि प्रथम उत्तम माणूस होण्याचे स्वप्न बाळगावे, असे आवाहन कॅप्टन डॉ.मिलिंद भगत यांनी केले. सहयोग प्रतिष्ठान यांच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत यश मिळविणार्‍या विद्यालयांचा व विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षक आणि गुणवंतांचा सत्कार करण्याचा शानदार गुणगौरव सोहळा साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन डॉ.मिलींद भगत तर अध्यक्षस्थानी सहयोग प्रतिष्ठान पोलादपूरचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, सहयोगचे कार्यवाह काठाळे व विश्‍वस्त सुरेंद्र जाधव, सुभाष ढाणे, सुखदेव मोरे, मदन एकबोटे, किसन सुरवसे, विजय दरेकर, लीलाजी शेडगे, अ.वि.जंगममास्तर तसेच मुख्याध्यापक पाटील, मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ, साधना चिकणे तसेच संजना शिंदे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस हॅलीकॅप्टर दुर्घटनेत शहिद झालेले सी.डी.एस. बिपिन रावत व त्यांच्या पत्नी तसेच लष्करी अधिकारी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. अंकिता जंगम यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version