विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विश्‍वातून बाहेर पडावं- दौंड

| म्हसळा | वार्ताहर |

पूर्वी लहानपणापासून व्यायामाचे धडे रुजविले जात होते, त्यातून निरोगी आयुष्य जगता येत होते. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही. तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून, ते अत्यंत धोकादायक होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विश्‍वातून बाहेर पडून फिटनेस साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्री. दौंड यांनी केले.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जावाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बालदिनानिमित्त म्हसळा तालुका हिवाळी क्रीडा स्पर्धाचे आयोजन तालुका क्रीडा समिती आणि पंचायत समिती शिक्षण विभाग म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समिर बनकर, न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश हाके, अंजुमनचे प्रा. मोहंमद तांबे, हलसंगी सर, बिजापुरे सर, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष नितिन पाटिल, केंद्रप्रमुख किशोर मोहिते, केंद्र प्रमुख नितिन मालिपरगे, नरेश सावंत, गटसमन्वयक इक्बाल कौचाली, सर्व साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. चेअरमन समीर बनकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन नेवरूळ विद्यालयाचे प्रा. मोरे यांनी, तर प्रा. हाके यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी आज ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्यांचे व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version