विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर मैदानी खेळ खेळावेत

माजी क्रिडा शिक्षक – पांडुरंग आरेकर यांचे प्रतिपादन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

शिक्षणा बरोबरच मैदानी खेळ देखील महत्वाचे आहे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. खेळ हा व्यक्तीच्या जीवनातील अभिभाज्य घटक आहे कोणत्याही खेळात मिळविलेले प्राविण्य आपले करिअर घडवू शकते. तरी पालकांनी विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यक्रमा बरोबरच मैदानी खेळ ही खेळले पाहिजे तसे विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे. जेणेकरून या खेळामधुन चांगले खेळाडू निर्माण होतील असे मत माजी क्रिडा शिक्षक – पांडुरंग आरेकर यांनी मुरुड जंजिरा नगरपरिषद शिक्षण विभागाच्या वतीने मराठी शाळा क्रमांक 4 मध्ये आयोजित शालेय क्रिडा उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी – नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी – दिपाली दिवेकर, माजी नगराध्यक्षा- स्नेहा पाटील, डॉक्टर – मकबुल कोकाटे, संजय गुंजाळ, प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, विजय सुर्वे, सिदेश लखमदे, ,विजय सुर्वे, युगा ठाकुर, उषा खोत, सायली गुंजाळ सर्वं मराठी शाळेतील शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थी पालक आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुरुड जंजिरा नगरपरिषद 6 शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version